जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वाजेगावच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत श्री वाजुबाई ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह ७ पैकी ४ जागा जिंकून एकहाती सत्ता प्राप्त केली आहे.
नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी पृथ्वीराजबाबा पाटील यांची त्यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात भेट घेतली,त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी लोकनियुक्त युवा सरपंच दिपक खराडे,अनिता जाधव(विनोद जाधव),दिगंबर कदम,रामचंद्र पाटणकर,सारीका मोहिते (धनंजय मोहिते) यांचा फेटा बांधून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले,'वाजेगावमध्ये काँग्रेस पुरस्कृत श्री वाजुबाई ग्राम विकास पॅनेलने भिकाजी, आनंदराव व सुभाष पाटणकर,रमेश खराडे व शैलेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत भरघोस यश मिळविले आहे. आता गावच्या समस्यांची यादी तयार करा.आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यामध्ये शंभर टक्के सौरऊर्जामय वाजेगाव व लोकसंख्येच्या प्रमाणात मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी टाकीचे नवीन बांधकाम या कामांना तात्काळ प्राधान्यक्रम देऊन वीज व पाणी या बाबतीत गावची चिंता मिटवा.. क्रिडांगण, गटारींची बांधकामे व स्मशानभूमी सुशोभीकरण ही कामेही या पंचवार्षिक कालावधीत पूर्ण करा.'
यावेळी सरपंच दिपक खराडे, दिगंबर कदम,आनंद,भिकाजी व रामचंद्र पाटणकर,विनोद जाधव,धनंजय मोहिते,यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.एन.डी.बिरनाळे,आशिष सुर्यवंशी उपस्थित होते.