जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात गेले 3 दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पुढील 2 दिवस पुण्यासह 10 जिल्ह्यांना गारपिटीचा तसेच राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे की- सध्याच्या परिस्थितीत,बंगालच्या मिचांग चक्रीवादळ तीव्र होणार असल्यामुळे,राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरातील मिचांग चक्रीवादळामुळे,देशातील अनेक राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असून, महाराष्ट्रात पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र,विदर्भ,मराठवाडा आदी भागातील तुरळक ठिकाणी, विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील विशेषतः बीड,औरंगाबाद,अहमदनगर, नाशिक,अकोला,अमरावती,बुलढाणा,पुणे,वाशिम,यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे, तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी दि.30 नोव्हेंबर 2023 ला गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता, भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.