जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास,20 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजनपूर्व आढावा बैठकीत,त्यांनी वरील माहिती दिली.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस,राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत,पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार,पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,तसेच पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यावेळी उपस्थित होते.100व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनास देण्यात येणारा 20 लाख रुपयांचा निधी हा,नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.