जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
केंद्रातील भाजप सरकारने धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढून त्यांचे तडकाफडकी निलंबन केले.लोकशाहीच्या या अपमानाच्या निषेधार्थ सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध आंदोलन केले.या वेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'भारतीय संसद ही देशाच्या लोकशाहीचे रक्षण करणारी सर्वोच्च संस्था आहे.या संसदेतील १४२ खासदारांचे निलंबन हा लोकशाहीवरील हल्ला व अपमान आहे.संसदेचे अधिवेशन चालू असताना संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून दोन तरुण स्मोक हल्ला करतात ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.या प्रकरणी मा.केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन करावे अशी रास्त मागणी करणाऱ्या विरोधी १४२ खासदारांचेच निलंबन ही लोकशाहीची क्रूर चेष्टा व हत्या आहे. या घटनेचा सांगली काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे. १४२ खासदारांचे तातडीने निलंबन रद्द करावे अशी आम्ही मागणी करत आहोत.'या आशयाचे निवेदन आज काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांना दिले.
यावेळी काॅम्रेड उमेश देशमुख,आशिष कोरी,रवी खराडे,अजय देशमुख,प्रा.एन.डी.बिरनाळे,वसिम रोहीले,धनराज सातपुते, डॉ.विक्रम कोळेकर,सचिन चव्हाण,विठ्ठलराव काळे,मारुती देवकर,अरुण पळसुले,अजित ढोले,राजेंद्र कांबळे,नाना घोरपडे,पृथ्वीराज चव्हाण,प्रशांत कांबळे,प्रशांत देशमुख, अमोल पाटील,धनंजय कुलकर्णी,आयुब निशाणदार,मालन मोहिते,भारती भगत,शेवंताताई वाघमारे,दीक्षित भगत,राजश्री कदम,कांचन खंदारे,प्रतिक्षा काळे,नंदा कोलप,बाबगोंडा पाटील,अविनाश जाधव,याकूब मणेर,डॉ. प्रताप भोसले, सुनिल पाटील,निखिल गवारे व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.