जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे रविवार दि. 17 डिसेंबर 2023 रोजी दौऱ्यावर येत असून,ते सांगली येथील टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.रविवार दि.17 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे,सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेस ने सांगलीत येणार असून,सुमारे ठीक सकाळी 9:00 च्या सुमारास ते टिळक स्मारक मंदिराला भेट देऊन,लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत.
सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ठीक 6:00 वाजता शताब्दी महोत्सवानिमित्त जाहीर सभेतून ते संबोधित करणार असून,स्वागताध्यक्षपदी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ असणार आहेत.
दरम्यान दुपारच्या वेळेस ते डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक घेणार असून,आगामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रणनीती व धोरणे याविषयी चर्चा होणार असल्याचे दिसत आहे.सांगलीच्या दौऱ्यावर येत असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा दौरा हा, विशेषत्वाने सांगलीतील सध्यपरिस्थितीत,राजकीय परिस्थितीवर महत्त्वाचा ठरेल असे दिसत आहे.