जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
संसदेच्या सर्वोच्च सभागृहात अभेद्य सुरक्षा कवच भेदून,2 तरुण घुसला प्रकरणी,आज लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्हीही सभागृहामध्ये अभूतपूर्व असा गोंधळ,विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घातला.लोकसभा व राज्यसभेच्या दोन्हीही सभागृहामध्ये,आज झालेल्या विरोधी पक्षांच्या तीव्र गोंधळाचे रूपांतर,लोकसभेतील 14 सदस्यांना व राज्यसभेतील 1 सदस्याला,अधिवेशन संपे तो पर्यंतच्या काळापर्यंत,निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले असून,हा मुद्दा संवेदनशील असल्याचे आदेशात म्हटले आहे.आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज,विरोधकांच्या गोंधळामुळे दिवसभर होऊ शकले नाही.लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून बुधवारी दुपारी 1:00 वाजता, 2 युवकांनी उड्या घेऊन लोकसभेमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी,आज सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले होते.दरम्यान आज सर्व विरोधी पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामाची मागणी रेटून धरली होती.लोकसभेचे अभेद्य सुरक्षा कवच भेदून,संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून 2 तरुणांनी सभागृहामध्ये उडी घेतल्यानंतर,संसदेच्या सुरक्षेमध्ये कुचराई झाल्या प्रकरणी,8 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलेले आहे.दरम्यान संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी,4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून,सागर शर्मा, डी. मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम आझाद अशी त्यांची नावे आहेत.त्याचबरोबर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित असून, त्यालाही दिल्लीतून अटक झाल्याचे वृत्त माध्यमांकडून समजत आहे.
दरम्यान सर्व विरोधी पक्षांनी या गोष्टीचे राजकारण करू नये, शिवाय हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा असून,यातून अराजकता निर्माण होईल अशी स्थिती विरोधकांनी करू नये असे आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. एकंदरीतच आज संसदेच्या दोन्हीही सभागृहामध्ये,संसदेचे अभेद्य सुरक्षा कवच भेदून संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून 2 तरुण घुसल्याप्रकरणी,प्रचंड असा गोंधळ विरोधी पक्षांच्या कडून झाल्या असल्याचे चित्र दिसत होते.