संसदीय प्रणालीच्या इतिहासात प्रथमच, संसदेचे अभेद्य सुरक्षा कवच भेदून 2 इसम घुसल्याप्रकरणी, विरोधकांनी घातलेल्या गोंधळात, एकाच दिवशी 78 खासदारांच्या निलंबनाचा विक्रम.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त सोशल मीडिया

संसदीय इतिहासाच्या प्रणालीत प्रथमच,संसदेचे अभेद्य सुरक्षा कवच भेदून 2 इसम घुसल्याप्रकरणी,विरोधकांनी घातलेल्या गोंधळात एकाच दिवशी 78 खासदारांचे निलंबन झाले आहे. संसदेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून, लोकसभेतील  33 खासदांर व राज्यसभेतील 45 खासदांर असे एकूण 78 खासदारांच्यावर निलंबन झाले आहे.मागच्या आठवड्यात संसदेचे अभेद्य सुरक्षा कवच भेदून,2 इसम लोकसभेच्या सभागृहात घुसले होते. 

या प्रकरणी विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करत,आक्रमकतेचा पवित्रा धरला होता. संसदेचे कामकाज सुरू होताच लोकसभेच्या व राज्यसभेच्या सभागृहात विरोधकांनी,संसदेचे सुरक्षा कवच भेदून 2 इसम घुसल्याप्रकरणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच ,"मोदी सरकार हाय हाय"," गृहमंत्री जबाब दो" अशा घोषणांनी हातात फलक घेऊन,सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय आणला. 

एकंदरीत वारंवार होत असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे, सभापतींना जवळपास 3 वेळा संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले. राज्यसभेतही हीच परिस्थिती कायम होती.अखेर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, लोकसभेतील 33 खासदारांवर व राज्यसभेतील 45 खासदारांवर निलंबन करण्याचा ठराव मांडून,एकूण 78 खासदारांचे निलंबन झाले आहे.यामध्ये के.सी.वेणूगोपाल, रणजीतसिंह सुरेजेवाला, रजनी पाटील, मनोजकुमार झा, जयराम रमेश,शक्तीसिंग गोहील,फुलोदेवी नेताम आदी खासदारांचा समावेश आहे. 

दरम्यान संसदेचे सुरक्षा अभेद्य कवच भेदून,लोकसभेच्या सभागृहामध्ये 2 इसम घुसल्या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून,हे प्रकरण गंभीर असून,विविध चौकशीतून जे सत्य समोर येईल,त्यानुसार संसदेच्या सुरक्षेची उपाय-योजना करण्यात येईल असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले आहे.एकंदरीत यापुढील दोन्हीही सभागृहांचे कामकाज कसे चालते ? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top