देशभरात नूतन वर्ष 2024 चे स्वागत हर्ष उल्हासात,महाराष्ट्र राज्यात सर्वत्र सरत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत.!-

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

देशभरात नूतन वर्ष 2024 चे स्वागत,हर्ष उल्हासात झाले असून,सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला असून,महाराष्ट्र राज्यात नूतन वर्षाचे स्वागत जल्लोषात झाले आहे.नूतन वर्षाचे स्वागत मध्यरात्री 12:00 वाजता नयनरम्य आतिषबाजीने केले असून,देशभरात सर्वत्र व महाराष्ट्र राज्यात सर्वत्र हॉटेल्स,रेस्टॉरंट,ढाबे गर्दीने भरून गेलेले होते. देशभरातील ठिकठिकाणी धार्मिक मंदिरात गर्दी झालेली होती. 

देशभरात व महाराष्ट्र राज्यात हॉटेल्सनी,रेस्टॉरंटनी,ढाब्यानी ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी,विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवून,आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. 

देशात व राज्यात सर्वत्र सायंकाळी 7:00 नंतर,हॉटेल्स, रेस्टॉरंट,धाबे,रस्ते ठिकठिकाणी गर्दीने भरून गेले होते. विशेषतः तरुणाई मध्ये एकच जल्लोष दिसत होता.देशभरात व महाराष्ट्र राज्यात नागरिकांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन,मध्यरात्री 12:00 वाजता नयनरम्य अतिशबाजीने नववर्षाचे स्वागत केले आहे. 

देशात व राज्यात काही सांस्कृतिक मंडळांनी,सांस्कृतिक कार्यक्रमासह अनेक कार्यक्रम आयोजित केले होते.एकंदरीत नववर्षाचे स्वागत,संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात फारच हर्ष उल्हासात साजरे झाल्याचे पहावयास मिळाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top