जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
यंदाच्या 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून,फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान हे उपस्थित राहणार असून,हा देशाचा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या 26 जानेवारी 2024 च्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाला, प्रमुख पाहुणे म्हणून दिलेले निमंत्रण,फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान यांनी स्वीकारले असल्याचे,परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
फ्रान्समध्ये 14 जुलै रोजी झालेल्या बँस्टील दिन संचलनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यंदाच्या वर्षी भारत व फ्रान्स यांच्यातील आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत असून त्यामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान हे प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित राहण्याने फार मोठे महत्त्व आले आहे.दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे,आंतरराष्ट्रीय विविध देशांशी असलेल्या संबंधाप्रमाणे,प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून,बऱ्याच देशांच्या अध्यक्षांना आजपर्यंत बोलवण्यात आले आहे.