जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महापालिका क्षेत्रातील गुंठेवारीधारकांच्या प्रश्नांसाठी सांगलीतील अप्पर तहसीलदार कार्यालयावर दि.९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता,गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.
सांगलीतील मंडल अधिकारी यांच्या कालावधीत अनेक गैरकारभार झाले आहेत.तुकडे बंदीचा भंग करुन त्यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जून महिन्यात मोर्चा काढला होता.मात्र भ्रष्ट मंडल अधिकाऱ्यांना प्रशासन पाठिशी घालत आहे.सांगलीतील अप्पर तहसीलदार कार्यालय,मंडल अधिकारी कार्यालय व चावडी येथे झिरो कर्मचारी कामावर आहेत.त्यांना तात्काळ काढण्यात यावे.जनतेची लूट थांबवावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.मात्र या आदेशास केराची टोपली दाखवण्यात आली.
झिरो कर्मचारी गुंठेवारी धारकांचे व प्रस्ताव निर्गत केले जात नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानले जात नाही.या विरोधात शिवेसेना गुंठेवारी समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी यांनी जाहीर केले आहॆ .
यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा मनीषाताई पाटोळे मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रतीक पाटील,राज्य उपाध्यक्ष नईमभाई शेख,युवराज मोने,सतीश देसाई उपस्थित होते हेमाताई कदम,सीमा ताई गायकवाड,लक्ष्मीताई मिरजे,शहाजीबापू जाधव,रामदास सावंत उपस्थित होते.