जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण समारंभ संपन्न झाला.रत्नागिरी येथे लोकार्पण झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा,गेल्या ऑगस्ट महिन्यात केल्यानंतर,आज त्याला मूर्त स्वरूप आले.दरम्यान रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी मान्यता दिली असून,रुग्णालय हे 430 बेड्स असलेले अत्याधुनिक सुसज्ज असणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वच जिल्ह्यांच्या ठिकाणी,अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले स्पेशालिटी रुग्णालये उभारण्याचे आश्वासन, त्यांनी आज रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी दिले.आज रत्नागिरी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नमो ११ सुत्री कार्यक्रमाचा प्रारंभही,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होऊन,नमो शेततळी अभियाना अंतर्गत लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊन,त्यांचा यथोचित सन्मान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.