जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात उद्यापासून कोकण वगळता सर्वत्र थंडीचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होणार आहे.कोकण वगळता राज्यातील इतरत्र सर्वच ठिकाणी पाऊस गेला असून, राज्यात सर्व ठिकाणी कोरडे वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या मिचांग चक्रीवादळामुळे,सर्वत्र अवकाळी पावसाचे राज्यात सावट तयार झाले होते.
सध्यपरिस्थितीत हिमालयात,पश्चिमी चक्रवात तीव्र स्वरूपात चालू होत असल्याने,राज्यात सर्वत्र थंडीचे वातावरण निर्माण होण्यास,पोषक वातावरण निर्माण झाले आहे.राज्यातील बऱ्याच भागामध्ये गार वारे सुटले असून,11 डिसेंबर पासून राज्यात सर्वत्र किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल, असा प्राथमिक अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
11 डिसेंबर पासून हिमालयात पश्चिमी चक्रवात सुरू होत असल्यामुळे, थंड वारे राज्यात वाहण्यास सुरुवात होतील. महाराष्ट्र राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशाने घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकंदरीतच राज्यातील नागरिकांना हवीहवीशी वाटणारी उबदार थंडी ची चाहूल, राज्यात उद्यापासून सुरू होणार आहे.