जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
अयोध्या क्षेत्री दि. 22 जानेवारी 2024 रोजी 12 वाजून 20 मिनिटांनी,श्रीरामाच्या मंदिरातील राम लल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी,पुरोहित म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील असणारे वेदांचे गाढे अभ्यासक,प्रकांड पंडित श्री गिरीश वरुडकर शास्त्री (उंब्रज) यांची निवड झाली आहे.श्रीयुत गिरीश वरुडकर शास्त्री हे उंब्रज येथील असून,ते एक पश्चिम महाराष्ट्रातील वेदांचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित आहेत. अयोध्या क्षेत्री श्री राम मंदिरात होणाऱ्या श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी,सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज येथील श्री गिरीश वरुडकर शास्त्री यांची पुरोहित म्हणून निवड होणे ही,सातारा जिल्ह्यासाठी भूषणावह अभिमानाची घटना आहे.
दि.22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी अयोध्या क्षेत्री श्रीराम मंदिरात श्री राम लल्लाच्या मूर्ती,सुमारे 500 वर्षानंतर पुन्हा मूळ स्थानावर विराजमान होणार असून, "याची देही,याची डोळा" हा सोहळा अनुभवण्यासाठी, विदेशातून व आपल्या देशातून श्रीराम भक्त भाविक अयोध्या क्षेत्री जाण्यासाठी उत्सुक आहेत.सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज येथील पश्चिम महाराष्ट्रातले वेदांचे गाढे अभ्यासक असणारे व प्रकांड पंडित असणारे श्रीयुत गिरीश वरुडकर शास्त्री यांची,श्री राम मंदिराच्या श्री रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी,पौरोहित्य करण्यासाठी"पुरोहित"म्हणून झालेल्या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.