जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
गेले तीन वर्षे श्री स्वामी समर्थ चारिटेबल ट्रस्टच्या वतीने,झी टीव्हीवरील गाजलेल्या गजर कीर्तनाचा व सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम सादर होत असतो.श्री.स्वामी समर्थ मंदिर तृतीय वर्धापन दिन व कलशारोहण सोहळ्यानिमित्त,रविवार दि.17 डिसेंबर 2023 ते बुधवार दि.20 डिसेंबर 2023 या कालावधित आयोजित झी.टी.व्ही.वरिल "गजर किर्तनाचा व सोहळा आनंदाचा" या कार्यक्रमाचा शुभारंभ रविवार दि.17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.श्री.संजय(काका) पाटील यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून आपण या कार्यक्रमाला व झी.टी.व्ही.च्या गजर किर्तनाचा व सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात उपस्थित राहुन,भागवताचार्य ह.भ.प.श्री.केशव महाराज उखळीकर (परळी- ) वैजनाथ यांचे,श्रीकृष्ण कथा व श्री.दत्त कथा यांचे श्रवण करावे असे आवाहन,श्री स्वामी समर्थ चारिटेबल ट्रस्ट व सर्व स्वामी भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.