जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
यावेळी खासदार संजयकाका पाटील म्हणाले सातारा,सांगली सोलापूर जिल्ह्यातील तब्बल,१ लाख २१ हजार ४७५ हेक्टर शेतीला पाणी देण्यासाठी विस्तारित टेंभू योजना मंजूर होणे आवश्यक होते यासाठी लागणाऱ्या ७ हजार ३७० कोटीच्या खर्चास मान्यता,व अतिरिक्त ८ टीएमसी पाणी यासाठी आपण सातत्याने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चितपणे या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेल.ज्याचा थेट १ लाख २१ हजार ४७५ हेक्टरला फायदा होणार आहे.पुढे बोलताना खासदार पाटील म्हणाले विस्तारित टेंभू योजनेत टप्पा अ व ब,टेंभू टप्पा ५ची वितरण व्यवस्था,पळशी उपसा योजना,यांची कामे होणार आहेत.त्याचबरोबर विस्तार टेंभू योजनेत कवठेमंहाकाळ बेवनुर व आटपाडी कामथ तलाव गुरुत्वनलिका यांचा समावेश करण्यात आहे,ज्याचा थेट फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.तसेच खानापूर मधील वंचित १५,आटपाडी १३,तासगाव१३,कवठेमहांकाळ ८,जत ४ अशा गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.
संजयकाका यांनी सांगितले की,या विस्तारित टेंभू योजनेला मान्यता मिळावी यासाठी आठ टीएमसी अतिरिक्त पाण्याची तरतूद करण्यात आली आहे ज्यामुळे सध्या सुरू असलेल्या योजनांना कोणताही धक्का लागणार नाही या योजनेअंतर्गत माण खटाव साठी २.५ सांगली साठी ४.५ तर सांगोला साठी १ टीएमसी पाण्याची तरतूद स्वतंत्रपणे करण्यात आले असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.खासदार म्हणाले या योजनेसंदर्भात पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक पाहणी दौरे केले.दौऱ्यादरम्यान टेंभू आणि म्हैशाळ योजना अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आणि चालू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाणी केली व चालू सिंचना संदर्भात आढावा घेतला,तसेच नागरिकांच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपायोजनांचा अभ्यास केला व त्या अनुषंगाने उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.ते म्हणाले टेंभू विस्तारित योजनेस महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाची मंजुरी यावर्षी १७ नोव्हेंबर तसेच ८ टीएमसी पाण्याला ३० सप्टेंबर व केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची (TOR)मान्यता २ नोव्हेंबर ला मिळाली आहे.आज म्हणजेच १४ डिसेंबरला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे हा दिवस सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक असेल,असेही यावेळी खासदार पाटील यांनी नमूद केले.
खासदार संजयकाका पाटील हे सातत्याने टेंभूच्या विस्तारित योजनेला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील होते.अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जिथे जिथे पाण्याची आवश्यकता आहे,ज्या भागात कोणत्याही योजनेचे पाणी पोचले नाही तो सर्व भाग विस्तारित योजनेत समावेश होवून ओलीताखाली यावा,यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी व जलसंपत्ती नियामक प्राधिकरण च्या मजुरीसाठी काकांनी विशेष प्रयत्न केले.यापूर्वी देखील केंद्र सरकार च्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमधून ताकारी म्हैसाळ योजनेसाठी २०९२ कोटी रु.,तसेच बळीराजा जलसंजीवनी योजनेमधून टेंभू योजनेसाठी १२०५ कोटी रु.व विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी १००० कोटी रु.म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणेसाठी जर्मन बँकेकडून १४४० कोटी रुपये अर्थ सहाय्य उपलब्ध करण्यात खासदार संजयकाकाना यश मिळाले.पाण्याविना कोणीही वंचित राहू नये,शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे यासाठी मी प्रयत्नशील आहे .केवळ आपल्या जिल्ह्यासाठी नव्हे तर दुष्काळी पट्ट्यासाठी विस्तारित टेंभू योजना महत्त्वाची होती.अखेर आज या योजनेला आज प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.आजचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असेल.