जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त: सोशल मीडिया
दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाने खेळाडूंच्या हिताचा निर्णय झाला असून,भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी एखादी महिला असावी असे मत,भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिने म्हटले आहे.सध्याच्या परिस्थितीत कुस्ती महासंघातून मी निवृत्ती घेतली असून,त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही,यापुढे मी खासदार म्हणून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे,भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे भारतीय कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट यांनी स्वागत केले असून,या निर्णयामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावेल असे वाटत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांसह नवी कार्यकारणी निलंबित करण्याच्या निर्णयावर,केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केलेले निलंबन मागे घ्यावे अशी विनंती भारतीय कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष संजय सिंह यांनी केली असून,आमची विनंती मान्य न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकंदरीतच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून घेतलेल्या निर्णयाचे भारतीय कुस्तीपटूंनी व कुस्तीप्रेमी रसिकांनी स्वागत केले आहे.