जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्हा व ग्रामीण च्या वतीने माहेश्वरी भवन येथे सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत "महाराष्ट्रभिमान" बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थित होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार युवक चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे संपूर्ण राज्यभर संघटना वाढी साठी काम करत आहेत.त्याच अनुषंगाने बैठकीमध्ये सर्व युवक संघटनेचा तालुका निहाय आढावा घेत सूचना व मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी जिल्ह्यातील सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील,शरदभाऊ लाड,युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक,युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुल पवार,सागर घोडके,सचिन जगदाळे,हरिदास पाटील तानाजी गडदे,उत्तम कांबळे,मुस्ताक रंगरेज,आयुब बारगीर, विज्ञान माने,महालिंग हेगडे,आकाराम कोळेकर,संदीप व्हनमाने आदी प्रमुख व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.