जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क:
(अजित निंबाळकर)
बुधवार दि.६ डिसेंबर २०२३ महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी ठीक ११.०० वाजता इन्साफ फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इरफान हलगले,अजित मोरे,नजीर महात,मोहनराव जाधव,बाळासाहेब मुधोळकर यांच्या हस्ते झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबीरला प्रारंभ झाला.सदर कार्यक्रमातील रक्तसंकलन अर्पण ब्लड बँक ला देण्यात आले.या कार्यक्रमाला उल्लेखनीय प्रतिसाद होता.
या वेळी इन्साफ फाऊंडेशन चे संस्थापक शाहिद सर, बबनराव कावडे,सुहेल शेख,सचिन आडसुळे,प्रविण बनसोडे,नागेश शिंपी,एड.विजय कामत,हाफीज खालीद इनामदार,सुमैय्या पत्रेवाले,अय्याज मुजावर आदि मान्यवर उपस्थित होते