जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने दि.२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीराम मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या,आमंत्रणाच्या अक्षता सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घरात देण्यात येणार आहेत.त्या अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा रविवार दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी,सकाळी ९ वाजता मारुती चौकातून निघणार आहे.त्या शोभायात्रेच्या नियोजनासाठी,शनिवार,दि.१६ डिसेंबर रोजी संध्याकाळी सांगलीतील सर्व हिंदुत्ववादी संघटनांची एकत्रित बैठक उत्साहात संपन्न झाली.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब देशपांडे,यांच्यासह माजी आमदार नितीन राजे शिंदे,पृथ्वीराज भैय्या पवार,श्रीकांत तात्या शिंदे,महेंद्र चंडाले,बाळासाहेब मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर,श्रीराम कुलकर्णी रणजीत शिंदे,आकाश जाधव,राजाभाऊ पडसलगीकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीचे संयोजन श्री विवेक काळे यांनी केले.