जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी आपली मागणी सनदशीर मार्गाने मांडावी,तसेच खंडपीठ कोठे व्हावे? या निकषांमध्ये कोल्हापूर हे ठिकाण बसत असेल तर,कोणाची हरकत असण्याचे कारण नाही,असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटले आहे.कोल्हापूरला खंडपीठ होण्याच्या मागणीसाठी,उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घ्यावी,पण न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणे, पक्षकारांना ओलीस धरणे अशा बाबीतून खंडपीठ साध्य होणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटले आहे.कोल्हापूर हे ठिकाण खंडपीठाच्या निकषात बसून, खंडपीठ झाले तर, मी स्वतः उद्घाटनाला येईन असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले आहे.
आज जिल्हा न्यायालय संकुलाच्या प्रांगणात,राज्यस्तरीय वकील परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.आज झालेली राज्यस्तरीय वकील परिषद ही," न्याय सर्वांसाठी "या संकल्पनेची अंमलबजावणी,आधारित विषयावर झाली.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने,आज राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.कोल्हापूरला खंडपीठ व्हावे असे माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी आपल्या अहवालात नमूद केले असल्याचे प्रतिपादन कौन्सिलचे माजी अध्यक्ष एडवोकेट विवेकानंद घाडगे यांनी नमूद केले.
दरम्यान राज्यस्तरीय वकील परिषदेमध्ये राज्यातील 19 ज्येष्ठ विधीज्ञांचा सत्कार करण्यात आला.त्यात कोल्हापूरचे कुंतीनाथ कापसे व विलास दळवी यांचा समावेश आहे.बार कौन्सिल तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा "विधी महर्षी पुरस्कार" उच्च न्यायालयाचे जेष्ठविधीज्ञ वी.आर.मनोहर आणि श्रीहरी आणे याला देण्यात आला असून,ज्येष्ठ विधीज्ञांची माहिती असलेले एक पुस्तकही या निमित्ताने प्रकाशीत झाले.विशेषत्वे करून कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी.बी.वराळे हे आज झालेल्या राज्यस्तरीय वकील परिषदेमध्ये उपस्थित होते.