-सांगली जिल्ह्यातील वाळवा क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने राजर्षी शाहुंच्या विचारांचा घडला 'जागर'.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार या उद्देशाने गेली तेरा वर्षे कार्यरत असलेल्या शाहू छत्रपतीं फाउंडेशनच्या 'राजर्षी' या दिनदर्शिकेचे प्रकाशन शाहू महाराजांचे जिवंत स्मारक असलेल्या राधानगरी धरणस्थळ परिसरात राधानगरीच्या तहसीलदार सौ अनिता देशमुख यांच्या हस्ते झाले.
वाळवा( जिल्हा सांगली) येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा प्रकाशन सोहळा शाहू महाराजांच्या विचारांचा जागर घड़वणारा सोहळा ठरला. शाहू छत्रपतीं फाउंडेशनचे अध्यक्ष आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.जॉर्ज क्रुझ, संस्थापक सचिव जावेद मुल्ला यांच्या पुढाकाराने झालेल्या या प्रकाशन सोहळा प्रसंगी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या श्री देवी इंदुमती बोर्डिंगचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दुर्वास कदम,आरोग्य आणि कुटुंबकल्याण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश साळे बालभारतीच्या गणित विषय समितीचे संचालक ड़ी डी पाटील,वजीरभाई मकानदांर,माजी सैनिक रवींद्र देसाई,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र संकपाळ,सातापा कांबळे,आसिफ सरख़वास,जावेद मुजावर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार सौ अनिता देशमुख यानी राधानगरी धरणस्थळ परिसरात 'राजर्षी' दिनदर्शिकेचे प्रकाशन ही शाहू महाराजांच्या कार्याला ख़रीखुरी सलामी असल्याचे गौरवोद्गार काढले.या वेळी प्रकाशन सोहळा प्रसंगी उपस्थित असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. या विद्यार्थ्यानी शाहू धरणस्थळ परिसरात स्वच्छता मोहीम राबवून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन केले .