सिंधुदुर्गमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेली शिवचरित्र तैलचित्रे ही,सांगलीच्या श्रीकांत चौगुले यांच्या कुंचल्यातून साकारलेली,सांगलीत चित्रकार श्रीकांत चौगुले यांचा,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते सत्कार.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

छ.शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक आहेत.त्यांच्या  सामर्थ्यावर सांगलीच्या श्रीकांत चौगुले यांनी हुबेहुब साकारलेल्या शिवचरित्र तैलचित्रांचे अनावरण काल सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.त्यामुळे सांगलीचे नाव देशभर झाले.ही नेत्रदीपक शिवचरित्रावरील तैलचित्रे सांगलीच्या गावभागातील श्रीकांत आण्णा चौगुले यांच्या कुंचल्यातून साकार झाली आहेत.श्रीकांत चौगुले हे छ. शिवबांचे सामर्थ्य चित्रबध्द करणारे सांगली ब्रँड सर्वोत्कृष्ट चित्रकार आहेत,सांगलीकर म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो म्हणून तातडीने आम्ही त्यांच्या गावभाग सांगली येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला. 

त्यांनी सांगलीची कर्तबगारी दिल्ली दरबारी नेली .. आता शिवचरित्रावर चौगुले यांनी साकारलेल्या १२५ तैलचित्रांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.शिवचित्रकार श्रीकांत चौगुले यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करताना पृथ्वीराज पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, 'अथक १४ वर्षे,प्रसिध्दीची अपेक्षा न करता केवळ छ.शिवाजी महाराज या एकाच विषयावर शिवबांच्या सामर्थ्याला हुबेहुब तैलचित्रात साकार करणं ही अवघड कला आहे.यावेळी,' बहुतेक सर्व चित्रे सरळ ब्रशने काढणे,शिवचरित्रावरील सर्व तैलचित्रे ही घटना जेथे घडली तेथे जागेवर जाऊन काढण्याचे अजब कौशल्य चौगुलेंच्या कुंचल्यात आहे.आता त्यांची तिसरी पिढी या कला क्षेत्रात काम करते अशी माहिती सातगोंडा पाटील व राजकुमार पाटील यांनी दिली.श्रीकांत चौगुले यांनी शिवचरित्रावर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन सांगलीत भरवण्याचे नियोजन करून सांगलीच्या संपन्न कलावैभवाला उजाळा देण्यात येईल असेही पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. 

उत्तरादाखल चौगुले यांनी वजीमदार आणि गोरे यांच्या सहकार्यामुळे मी या क्षेत्रात काम करत आहे.. छ.शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काढलेली चित्रे, प्रख्यात आर्टिस्टच्या निमंत्रणावरून केलेला जपान दौरा आणि अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये स्थापीत झालेली माझी चित्रे ही माझ्या तपश्चर्येची फलश्रुती आहे.आज माझ्या घरी येऊन माझा सपत्नीक सत्कार पृथ्वीराज पाटील यांनी केला. या सत्कारामुळे छ. शिवाजी महाराज आणि माझ्या कुंचल्यावर पृथ्वीराज पाटील अंतःकरणपूर्वक प्रेम करतात हे प्रकर्षाने जाणवले.

यावेळी सौ.महादेवी चौगुले,सातगोंडा पाटील,प्रदीप दडगे, दादासो पाटील,शरद चौगुले,माधव पतंगे,संजय चौगुले, विशाल पाटील,संजय पाटील,रमेश दडगे,राजकुमार मगदूम, सुरेश दडगे,चेतन दडगे,प्रदीप दडगे,युवराज मगदूम,अजित पाटील,मंगावतीकर पाटील, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मालवणकर,अशोक दडगे व गावभागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top