नवी दिल्ली येथे,"नवी दिल्ली ब्रँड इंडिया संस्थे"च्या वतीने,निर्भीड सामाजिक नेते व पत्रकार रामदासजी ताटे यांना,"आंतरराष्ट्रीय अभिमान गौरव" पुरस्काराने सन्मानित.--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

निर्भीड सामाजिक नेता व पत्रकार रामदास ताटे यांचा नवी दिल्लीत अंतरराष्टीय अभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नवी दिल्ली ब्रॅड इंडिया  संस्थेचा वतीने,  आंबेडकरी चळवळीतील डॅशिंग नेता व निर्भीड पत्रकार रामदास ताटे यांना आंतरराष्ट्रीय अभिमान पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे.संस यांचे हस्ते रामदास भाऊ ताटे यांना आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार नवी दिल्ली या ठिकाणी देण्यात आला.ऑडिटर हॉल नई दिल्ली या ठिकाणी वरील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.रामदास भाऊ ताटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व कार्य बद्दल सदरहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये 35 वर्षे प्रामाणिकपणे काम केलेले आहे.अनेक सामाजिक काम केल्याबद्दल त्यांना,आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार हे देण्यात आलेले आहेत तसेच न्यूज महाराष्ट्र के-9 निर्भिडे पणे पत्रकारी काम केल्याबद्दल,एम.एस.सी.बी. यांच्या वतीने इंटरनॅशनल बिजनेस आव्हाड ही त्यांना देण्यात आलेले आहे.दोन गौरव पुरस्कार देऊन रामदास भाऊ ताटे नवी दिल्ली या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे.

 रामदास भाऊ ताटे यांना यापूर्वी समाज भूषण पुरस्कार तसेच अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.आता या पुरस्कारानंतर त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते निर्भीड पत्रकार म्हणून,दि. 07 जानेवारी रोजी इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात येणार आहे,तसेच भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने त्यांना,दि.11 जानेवारी रोजी सी.जी.एस. क्लब मुंबई,भाई बंदर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल प्लस 24 सालाचा प्रथम पुरस्कार,प्रदेश अध्यक्ष रामदासजी ताटे यांना देण्यात येणार आहे.त्यांनी आजवर त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य काम केले आहे. त्यामुळे त्यांना हे अवॉर्ड सन्मानित करण्यात येत आहे,तसेच लवकरच रामदास भाऊ ताटे यांचे पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन  करण्यात येणार आहे. 

रामदास ताटे द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर राज्यातील ३६ जिल्ह्यात ते कार्यरत असून, ते  ७००० पत्रकारांचे  नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या या सर्वोच्च कार्याची दखल घेऊन,सदरहू पुरस्कार त्यांना दिला गेला आहे.तसेच पत्रकारांवर होणारा अन्याय- अत्याचार जे विरोधात ते धडपडत असतात.त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरा करत असतात. वेळेप्रसंगी ते स्वतः जीवाची परवा न करता,पत्रकारांसाठी त्यांना बरोबर घेऊन लढत असतात,तसेच सर्वसामान्य गोरगरिबांसाठी ते अहोरात्र श्रम सेवा करीत असतात. त्यामुळे त्यांचे मानवता सेवेची दखल संस्थेने घेऊन,त्यांचे कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. यापूर्वीही मावळचे महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते ही त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे.असे अनेक नामवंत पुरस्कार रामदास ताटे याना प्रदान करण्यात आले आहेत.समाजातील  अहोरात्र गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत आहेत.तसेच द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या माध्यमातून,पत्रकारांच्या समस्या निवारण्याचे कार्य करीत आहेत. समाजात मनुवादी,सनातनी कडुन होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात घटना स्थळी प्रत्यक्ष  स्वतः जाऊन,वार्ताकंना द्वारे  त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. कोविड महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता  त्यांनी स्वतः नागरिकांना मदत केली आहे.विद्यार्थ्यांसाठी स्वतः जेवण चे डबे त्यांनी व त्यांच्या  कुटुंबानी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले आहेत.हे कार्य त्यांनी स्वखर्चाने  केले व करीत आहेत.महाड येथील डोंगर कोसळून झालेल्या  दुर्घटनेतील पिडीत गोरगरिबांना त्यांनी कपड्या पासून सर्व साहित्य उपलब्ध करून मानवता  सेवा केली.कोविड महामारीच्या काळात निराधार अंध अपंग व सर्वसामान्य नागरिकांना सर्व कडधान्य तांदूळ,तेल,साबण, कपड्या पासून सर्व साहित्य रामदास भाऊ ताटे यांनी व त्यांच्या कुटुंबाने दिले आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन नवी दिल्ली या ठिकाणी गौरव करण्यात आले आहे.निर्भीडपणे पत्रकारीतेत न्यूज महाराष्ट्र के -9 च्या माध्यमातून  निर्भीडपणे वृत्त प्रसारित करीत असतात.त्यांचे  या समाज व निर्भीड पत्रकारीता कार्याची दखल घेऊन त्यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभळकर यांच्या संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.रामदास भाऊ ताटे यांचे कार्य, संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.तळागाळापर्यंत ते सर्वांसाठी काम करत आहेत.पत्रकारांसाठी काम करत आहेत त्यामुळे त्यांचा हा यथोचित गौरव करण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top