जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(रितेश तांदळे)
अयोध्या क्षेत्री श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या उद्घाटनापूर्वी, अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून,"अयोध्या धाम" करण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव "अयोध्या धाम" करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार उत्तर प्रदेश मधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने नुकताच,अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव "अयोध्या धाम" करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या निर्णयाचे देशभरात रामभक्त स्वागत होत असून,सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.येत्या येणाऱ्या नवीन वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी, अयोध्या क्षेत्री श्री.प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा व राम लल्लांच्या भव्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी आयोध्येत सध्या युद्धपातळीवर अंतिम तयारी सुरू असून,सदरहू सोहळ्यास स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सह देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अयोध्येतील अयोध्या धाम रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणासाठी, मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून,अयोध्या क्षेत्री येणाऱ्या सर्व राम भक्तांच्यासाठी असणाऱ्या सोयी- सुविधेसह "अयोध्या धाम" स्टेशन सज्ज झाले आहे.नवीन "अयोध्या धाम" रेल्वे स्टेशन हे जणू काही श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट स्वरूपात प्रतिकृतीत रूपांतर झाल्याचे दिसत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.30 डिसेंबरला अयोध्या क्षेत्री दौऱ्यावर असून,यापूर्वी अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव "अयोध्या धाम,करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे,त्यांच्या दौऱ्याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे."अयोध्या धाम" मध्ये असणाऱ्या पुनर्विकास नव्या भावनांच्या वास्तूचे उद्घाटनही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार असून ,अयोध्या ते दिल्ली "वंदे भारत ट्रेनचे" लोकार्पण हे देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदरहू होणाऱ्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम हा, "अयोध्या धाम" रेल्वे स्थानकावर जवळपास अर्धा तासाचा असून, रेल्वे प्रशासनाने या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी केली आहे.अयोध्या क्षेत्री सध्या जिकडे पहावे तिकडे आनंदाचे व उल्हासदायक वातावरण दिसत असून,राम भक्तांच्या मध्ये रामभक्तीचा विलक्षण आनंददायक संचार अनुभवास येत आहे.