आरोग्य भाग- 18
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
शारीरिक आरोग्यासाठी हिवाळ्या ऋतूत खाण्यासाठी आवश्यक असलेल्या,हिवाळी खरबूज या फळाविषयी अत्यंत उपयुक्त माहिती देत आहोत.हिवाळी खरबूज हे थंडी म्हणजेच हिवाळी ऋतूमध्ये खातात.त्यात विटामिन- सी,विटामिन- बी, भरपूर प्रमाणात असून,आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हिवाळी खरबूज खाल्ल्याने बद्धकोष्ठते पासून शरीरास तत्काल आराम मिळतो.हिवाळ्यामध्ये थंडी फार पडलेली असते. त्यावेळेला हिवाळी खरबुजा पासून ज्यूस,सुप,भाज्या,पेठे, मिठाई यासारखे भरपूर पदार्थ तयार करता येतात.
हिवाळी खरबूज या फळापासून खालील प्रमाणे शारीरिक आरोग्यास फायदे मिळतात.
शरीर वजन कमी करते.
हिवाळी खरबूज खाल्ल्याने कॅलरीज कमी होऊन,वजन नियंत्रित राहते.यामध्ये विटामिन- सी व विटामिन- बी भरपूर प्रमाणात असून,ते हाडा संबंधित सर्व शारीरिक समस्या दूर करते.
शारीरिक पचनशक्ती सुधारते.
हिवाळी खरबुजामुळे शारीरिक बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्यामुळे हिवाळी खरबूज हिवाळी ऋतूमध्ये खाण्यासाठी आहारात वापर करा.
मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर.
हिवाळी खरबूज खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताच्या साखरेची पातळी कमी होण्यास, तसेच नियंत्रित ठेवण्यास फार मोठी मदत होते.त्यामुळे हिवाळ्या ऋतूमध्ये मधुमेही रुग्णांनी हिवाळी खरबूज अवश्य आहारात खाण्यासाठी ठेवावे.
शरीरातील जळजळ कमी करते.
हिवाळ्या ऋतूमध्ये हिवाळी खरबूज खाल्ल्याने,शरीरात कोणत्याही प्रकारचा झालेला जळजळ, दाह कमी होतो. हिवाळी खरबुजामध्ये पोषक तत्व असल्याने,त्याच्या नियमित सेवनाने शरीराची जळजळ कमी होते.
हिवाळी खरबुजा पासून अनेक प्रकारचे प्रकारचे पदार्थ बनविता येतात. हिवाळी खरबुजा पासून ज्यूस, सूप,मेवा- मिठाईचे पदार्थ,भाज्या,सुक्या- वड्या असे अनेक पदार्थ बनवता येतात.
या लेखाचे शब्दांकन श्री अनिल जोशी यांनी केले असून, सदरहू लेख जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.