जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी नितीन करीन यांची नियुक्ती झाली असून,कालच सरत्या वर्षाच्या शेवटी केंद्र सरकारच्या मान्यतेची,त्यांचे नावावर मोहर झाली.आज मुंबई डॉ.नितीन करीर यांनी राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सैनिक यांचे कडून कार्यभार स्वीकारला.
यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभाग सचिव पदी डॉ.नितीन करीर हे कार्यरत होते.महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर महत्त्वाच्या पदावर काम केले असून,प्रशासकीय क्षेत्रातील कायदेशीर विषयाचा गाढा अभ्यास असलेले व्यक्ती म्हणून त्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मुदतवाढ मिळेल असे वाटत होते,परंतु त्यांना मुदतवाढ मिळाली नाही.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर हे जवळपास 3 महिने मुख्य सचिव पदावर कार्यरत असतील.त्यानंतर ते निवृत्त होतील.महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पदावर नियुक्त झालेले डॉ.नितीन करीर हे,वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, प्रशासकीय सेवेची परीक्षा पूर्वी उत्तीर्ण झाले आहेत.