जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नागपुरात काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने, हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्यावर आवाज उठवण्यासाठी,"हल्लाबोल मोर्चा" काढण्यात आला होता.
झोपेचा सोंग येणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित केलेला होता. राज्यातील शेतकरी बांधव सध्या,अवकाळी पावसामुळे पीक नुकसानग्रस्त झाले आहे.त्यांच्यावर फार मोठे आभाळ कोसळल्यासारखी स्थिती आहे.अशा परिस्थितीत झोपेचे सोंग घेऊन राहणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी,काल हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
कालच्या हल्लाबोल मोर्चामध्ये श्री.नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी,श्री.विलास औताडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल,श्री.तेजेंद्रसिंह चौहान कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल,श्री.रामगोविंद खोब्रागडे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल, श्री.कैलास उकिर्डे,श्री.प्रवीण आग्रे शहराध्यक्ष नागपूर काँग्रेस सेवादल व असंख्य सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कालचा महाराष्ट्र काँग्रेस कमिटी द्वारे आयोजित केलेला, नागपुरातील हिवाळी अधिवेशना दरम्यान निघालेला हल्लाबोल मोर्चा हा लक्षवेधी ठरला आहे.