जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेले सावनेरचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय,महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने घेतला आहे.महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने आज जारी केलेल्या पत्रकात वरील माहिती दिली आहे.नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी,नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने,आमदार सुनील केदार यांना दोषी ठरवले असून,5 वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेसह 12,50,000/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.यापूर्वी सुरेश हळवणकर यांची आमदारकी रद्द झाली होती व आता सावनेरचे सुनील केदार यांचा नंबर लागला आहे.
दरम्यान प्रचलित कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची शिक्षा न्यायालयाकडून सुनावली गेल्यानंतर,आमदारकी रद्द करण्याचे आदेश,एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.दरम्यान नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील सुनील केदार यांनी जर वरिष्ठ न्यायालयाकडून स्थगिती आणली तर,त्यांना पुन्हा सदस्यत्व मिळू शकते असे तज्ञांचे मत आहे.