जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
केंद्र सरकारने उसाचा रस व मोल्यासिस पासून इथेनॉल निर्मिती बंदी असणारा निर्णय मागे घेतला असून,आता साखर कारखानदारांना साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्याची मुभा असणार आहे.
केंद्र सरकारने सध्याच्या परिस्थितीत उत्पादनातील घट लक्षात घेऊन,उसाच्या रसापासून व मोल्यासीस पासून इथेनॉल निर्मितीस बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.देशभरातील साखर उद्योगावर सदरहू निर्णयाने प्रचंड नाराजी पसरली होती. अखेर साखर कारखानदारांकडून वाढत असलेला दबाव लक्षात घेता,केंद्र सरकारने उसाच्या रसापासून व मोल्यासिस पासून,इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली आहे.
चालू वर्षातील उसाचे उत्पादन हे जवळपास 37 दशलक्ष मेट्रिक टनावरून 32 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त होत होता.त्यामुळे देशातील केंद्र सरकारने सदरहू उसाचा रस व मोल्यासिस पासून,इथेनॉल निर्मिती बंदी घातली होती.एकंदरीत साखर कारखानदारांच्या एकजुटीच्या विरोधामुळे,सदरहू बंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला असून,देशातील साखर उद्योगांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.