जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
शहराचा झपाट्याने होणारा विस्तार व वाढते नागरीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता.केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या जुन्या पाण्याच्या टाक्या व नवीन उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून शहरातील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे. मनपाच्या नियोजनानुसार केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या पाईपलाईनच्या योजनेमुळे 2040 सालापर्यंत शहरातील नागरिकांना त्या- त्या भागात उभारण्यात आलेल्या 27 पाण्याच्या टाक्यांमधून मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.वाढते नागरीकरण व शहराचा विस्तार लक्षात घेऊन या पाण्याच्या टाक्या त्या - त्या भागामध्ये उभारण्यात आल्या असून यासाठी आणखी नवीन पाण्याच्या टाक्या उभाराव्या लागणार नाहीत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या जुन्या 15 पाण्याच्या टाक्या व सध्या अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या नवीन 12 पाण्याच्या टाक्या अशा एकूण 27 पाण्याच्या टाक्यांमधून शहरातील विविध भागात त्या त्या भागातील पाण्याच्या टाक्यांमधून मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.वाढते नागरीकरण, हद्दवाढीमुळे होणारा शहराचा विस्तार लक्षात घेऊन शहराच्या विविध भागांमध्ये या पाण्याच्या टाक्या क्षमतेनुसार उभारण्यात आल्या आहेत,यामुळे भविष्यात आणखी नवीन पाण्याच्या टाक्या उभाराव्या लागणार नाहीत.मार्च 2024 पर्यंत अमृत योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जुन्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून अमृत थेट पाईपलाईन योजना पहिल्या टप्प्या अंतर्गत नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.यामध्ये कदमवाडी,सम्राटनगर,ताराबाई पार्क, राजेंद्रनगर,बोंद्रेनगर,पुईखडी,शिवाजी पार्क,बावडा जलशुद्धीकरण केंद्र,वाडकर गल्ली- बावडा,गोळीबार मैदान, राजारामपुरी सायबर चौक,राजारामपुरी लकी बाजार,शाहूपुरी भाजी मंडई,मार्केट यार्ड,आपटेनगर आदी ठिकाणी असलेल्या जुन्या व नवीन पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे.
थेट पाईपलाईनमुळे कोल्हापूरला मुबलक पाणी मिळाले.कोल्हापूर शहराचा झपाट्याने होणारा विस्तार व वाढते नागरीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्याने शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शहरातील विविध भागांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.