जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सोशल मीडिया वृत्तसेवा
देशात काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला वाटा देऊन,जातीनिहाय जनगणना केली जाईल असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.नागपूर मधील दिघोरी येथील पटांगणा आयोजित केलेल्या काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त सभेत ते बोलत होते.
काँग्रेस पक्षाने संविधानाची निर्मिती करून,गरीब- श्रीमंतीचा भेदभाव नाहीसा करून,प्रत्येक देशातील नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊ केला.भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या 10 वर्षाच्या काळात सर्व संस्था बंद पाडून, पुन्हा राजे शाही आणण्याचा त्यांचे कडून मनोदय दिसत आहे. देशात मागासवर्गीयांची संख्या ही सर्वाधिक असून,दलितांची 15% व आदिवासींची 12% एवढी लोकसंख्या आहे.भारतीय जनता पक्षाला सामाजिक आरक्षण मोडीत काढायचे असल्याचे स्पष्ट होत आहे.काल काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथील दिघोरी मध्ये झालेल्या सभेस, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी,700 आमदार व इतर खासदार उपस्थित होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी,कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार,हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खु, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,मुकुल वासनिक, अविनाश पांडे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व प्रियांका गांधी या काही अपरिहार्य कारणास्तव सभेला उपस्थित नव्हत्या.नागपूर येथील काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या सभेस, काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.