जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दि १ डिसेंबर २०२३ रोजी खासदार संजयकाका पाटील यांनी, जिल्हा कलेक्टर यांना,अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले.गेल्या काही दिवसा पासून सांगली जिल्ह्यातील बहुतांशी गावामध्ये,पावसाने थैमान घातले आहे.ह्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष,बागायतदार ऊस,कांदा, तूर,गहू,ज्वारी,व रब्बी हंगामातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.या संदर्भात खासदार संजयकाका पाटील यांनी आज,जिल्हा कलेक्टर ह्यांची भेट घेऊन,तात्काळ नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्या संदर्भात पत्र दिले आहे.
सांगली जिल्ह्यात फळबागांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या मदतीवर, विसंबून आहे.त्यासाठी सांगलीचे खासदार संजय काका पाटील हे,जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाची मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांनी त्यासाठी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या संदर्भात पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.