जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याची बैठक संपन्न झाली.यावेळी राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब यांनी स्वागत केले,सदर बैठकीमध्ये आ.जयंत पाटील साहेब यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना घरोघरी राष्ट्रवादी मोहीम,बूथ सक्षमीकरण,नागरिकांची कामे या विविध विषयांवर चर्चा करत मार्गदर्शन केले.
बैठकीमध्ये हरिपूर ग्रामपंचायत मधील नूतन सदस्यांचा सत्कार ही करण्यात आला व राष्ट्रवादी पक्षामार्फत अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना कानाचे मशीन वाटप आ.जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.बैठकीचे आभार युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांनी मानले.
यावेळी गटनेते मैनुद्दीन बागवान,शेखर माने,सागर घोडके, हरिदास पाटील,उत्तम कांबळे,अभिजित हारगे,बाळासाहेब व्हनमोरे तानाजी गडदे,विष्णू माने,शेडजी मोहिते,अनिता पांगम,वंदना चंदनशिवे,वैशाली कळके,ज्योती अदाटे,मनगु सरगर,छाया जाधव,धनपाल खोत,संगीता हारगे,सविता मोहिते,मालन हुलवान,अपर्णा कदम,मुश्ताक रंगरेज,नर्गिस सय्यद,रज्जाक नाईक,समीर कुपवाडे,युवराज गायकवाड, उमर गवंडी,आयुब बारगिर ,विपुल केरीपाळे,जुबेर चौधरी, महालिंग हेगडे,प्रकाश सुर्यवंशी,प्रसाद मदभाविकर,हारून खतीब,आकाराम कोळेकर,संदीप व्हनमाने,वाजीद खतीब किशोर हत्तीकर,गँब्रियल तिवडे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.