युवासेनेच्या वतीने बालकल्याण संकुल मधील विद्यार्थ्यांसाठी १२th fail या चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन..!-

0

- युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कोल्हापूरच्या वतीने आयोजन.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री.ऋतुराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेना कोल्हापूरच्या वतीने आय.पी.एस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांच्या जीवनावरील १२th fail या चित्रपटाच्या शो चे आयोजन करण्यात आले होते.

◾बालकल्याण संकूलातील अनेक विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा आनंद घेतला.

 सदर उपक्रमाविषयी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांना देखील कळवण्यात आले,त्यांनी या उपक्रमा संबंधी युवा सेनेचे कौतुक करून आपण जिल्हा पोलीस प्रमुख असताना बालकल्याण संकुल येथे दिलेल्या भेटीची आठवण काढली.प्रतिकूल परिस्थिती आणि पडेल ते काम करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर १२ वी फेल ते आय.पी.एस असा रंजक प्रवास करणाऱ्या आणि कोल्हापूर शी वेगळे नाते असणाऱ्या एस.पी मनोजकुमार शर्मा यांच्या या चित्रपटातुन प्रेरित होऊन नक्कीच भविष्यात बालकल्याण संकुल मधून अनेक अधिकारी घडावेत,या हेतूने हा चित्रपट दाखवत असल्याचे यावेळी युवासेनेच्या वतीने सांगण्यात आले.

या उपक्रमाला शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव, उपशहरप्रमुख किरण पाटील,महिला आघाडी शहरप्रमुख पवित्राताई रांगणेकर,अमरजा पाटील, यशवंत पाटील, पिंटू साळोखे आदींनी भेट दिली.

यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक अविनाश कामते,जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे,युवती सेना शहरप्रमुख सौ.नम्रता भोसले,कोल्हापूर उत्तर मतदारसंघ अध्यक्ष शैलेश साळोखे, शहर सरचिटणीस विपुल भंडारे,शहर समन्वयक मंगेश चितारे, युवतीसेना उपशहरप्रमुख निवेदिता तोरस्कर,आय. टी. सेना शहरप्रमुख सौरभ कुलकर्णी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top