जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
काँग्रेसची "भारत जोडो न्याय यात्रा" दि.14 जानेवारी 2024 पासून मणिपूर येथून निघणार असून,ती 20 मार्च 2024 रोजी मुंबईला पोहोचणार आहे.
१)मणिपूर-मणिपूर राज्यांमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचा 107 किलोमीटरचा प्रवास असून 4 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे.
२)नागालँड-नागालँड राज्यातून भारत जोडो यात्रा 257 किलोमीटरचा प्रवास करणार असून,सुमारे 5 जिल्ह्यांमधून ती जाणार आहे.
३)आसाम-आसाम राज्यातून जवळपास 833 किलोमीटरचा प्रवास हा भारत जोडो न्याय यात्रेचा असणार असून,ती जवळपास 17 जिल्ह्यांमधून फिरणार आहे.
४)अरुणाचल प्रदेश-अरुणाचल प्रदेश राज्यातून भारत जोडो न्याय यात्रा ही जवळपास 55 किलोमीटरचा प्रवास करणार असून, 1 जिल्ह्यातून जाणार आहे.
५)मेघालय-मेघालय राज्यातून जवळपास 5 किलोमीटरचा प्रवास भारत जोडो न्याय यात्रा करणार असून,ती जिल्ह्यातून जाणार आहे.
६)पश्चिम बंगाल-पश्चिम बंगाल राज्यातून भारत जोडो न्याय यात्रा ही जवळपास 523 किलोमीटरचा प्रवास करणार असून, 7 जिल्ह्यांमधून ती फिरणार आहे
७)बिहार-बिहार राज्यांमधून भारत जोडो यात्रा जवळपास 425 किलोमीटरचा प्रवास करणार असून,राज्यातील 7 जिल्ह्यांमधून ती फिरणार आहे.
८)झारखंड-झारखंड राज्यांमधून भारत जोडो यात्रा ही जवळपास 804 किलोमीटर प्रवास करणार असून,सुमारे 13 जिल्ह्यांमधून ती फिरणार आहे.
९)ओडीसा-ओडीसा राज्यांमधून जवळपास 341 किलोमीटरचा प्रवास भारत जोडो यात्रा करणार असून, सुमारे 4 जिल्ह्यांमधून ती प्रवास करणार आहे.
१०)छत्तीसगड-छत्तीसगड राज्यांमधून सुमारे 536 किलोमीटरचा प्रवास भारत जोडो यात्रा करणार असून,ती जवळपास 7 जिल्ह्यांमधून फिरणार आहे.
११)उत्तर प्रदेश-उत्तर प्रदेश राज्यातून भारत जोडो यात्रा सुमारे 1074 किलोमीटरचा प्रवास करणार असून, ती जवळपास 20 जिल्ह्यांमधून फिरणार आहे.
१२)मध्य प्रदेश-मध्य प्रदेश राज्यातून जवळपास 698 किलोमीटरचा प्रवास भारत जोडो यात्रा करणार असून,ती जवळपास 9 जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे.
१३)राजस्थान-राजस्थान राज्यातून जवळपास 128 किलोमीटरचा प्रवास हा भारत जोडो यात्रेचा होणार असून ,सुमारे दोन जिल्ह्यातून ही यात्रा फिरणार आहे.
१४)गुजरात-गुजरात राज्यातून जवळपास 445 किलोमीटरचा प्रवास भारत जोडो यात्रा करणार असून,ती जवळपास 7 जिल्ह्यांमधून फिरणार आहे.
१५)महाराष्ट्र-महाराष्ट्र राज्यातून भारत जोडो यात्रा ही जवळपास 480 किलोमीटरचा प्रवास करणार असून, जवळपास 7 जिल्ह्यांमधून ती फिरणार आहे.
*"भारत जोडो यात्रा" विविध राज्यातून जवळपास सहा हजार सातशे किलोमीटरचा प्रवास करणार असून,एकूण 67 दिवसांची कालावधीत,"भारत जोडो यात्रे"च्या, देशातील 110 जिल्हे,100 लोकसभा मतदारसंघ,337 विधानसभा मतदारसंघ संपर्कात येणार आहेत,अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव जयराम रमेश जी यांनी सांगितले आहे.