जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील शेअर बाजारात काल भूकंप झाला असून,सुमारे 1628 अंशांनी सेन्सेक्स गडगडला.जागतिक शेअर बाजारातील उलथा-पालथीमुळे व एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या जोरदार विक्री झाल्यामुळे,देशातील शेअर बाजारात सेन्सेक्स 1628 अंशाने कोसळला.
कालच्या झालेल्या देशातील शेअर बाजाराच्या घसरणीमुळे बीएससी वरील बाजार मूल्यात,जवळपास 4.53 कोटी रुपयांचे नुकसान झाले.गेले काही दिवस देशातील शेअर बाजार 73000 चा सेन्सेक्स ओलांडल्यानंतर सकारात्मक संदेश येत होते.देशातील अग्रगण्य बँकेच्या तुलनेत असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये झालेली सर्वाधिक घसरण ही काल लक्षवेधी ठरली.काल टाटा स्टील,कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक,जेएसडब्ल्यू,बजाज फिनसर्वे,स्टेट बँक ऑफ इंडिया,इंडसिंड बँक आदी कंपन्यांचे शेअर भाव घसरले असून, इन्फोसिस,टेक महिंद्रा,टायटन,नेस्ले,पावर ग्रीन टेक्नॉलॉजी, टीसीएस आदी कंपन्यांच्या शेअर्स भावामध्ये वाढ दिसून आली.
एकंदरीतच जागतिक शेअर बाजारपेठेतील घसरण व नकारात्मक संकेतामुळे काल भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले.