आरोग्य भाग- 31
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
Type 2 Diabetes.कोणत्या खाद्यपदार्थांमुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो जाणून घ्या...
भारतासह जगभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.अगदी कमी वय असणारी तरुण मंडळी देखील या आजाराला बळी पडत आहेत.काहीजण मधुमेह टाळण्यासाठी तब्बेतीची विशेष काळजी घेतात,पण तरीही ते या आजाराला बळी पडतात.यामागे आनुवंशिकता हे एक कारण असू शकते, याशिवाय रोजच्या काही खाद्यपदार्थांमुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.कोणते आहेत ते खाद्यपदार्थ जाणून घ्या.
या खाद्यपदार्थांमुळे वाढतो टाईप २ मधुमेह होण्याचा धोका...
◾जास्त कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ...
‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार जास्त कार्बोहायड्रेट असणाऱ्या पदार्थांमुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका २१ टक्क्यांनी वाढतो.यामध्ये ब्रेड,केक,पास्ता अशा पदार्थांचा समावेश होतो.यांसह पांढरी साखर,पांढरे तांदूळ यांसारखे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो.
◾गोड पेय...
सतत गोड पेयांचे सेवन केल्याने वजन वाढण्याबरोबर टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या २०१० च्या एका अभ्यासानुसार रोज २ गोड पेयांचे सेवन केल्याने टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता २६ टक्क्यांनी वाढते.फळांचे रस,चहा,सोडा अशा गोड पेयांचे अतिसेवन टाळा.
◾फॅट असणारे पदार्थ...
लोणी,फ्रूट क्रीम मिल्क,चीज अशा दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात आढळते.तर तळलेल्या पदार्थांमध्ये,पॅकेटमध्ये उपलब्ध होणाऱ्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात आढळते.अशा जास्त फॅट असणाऱ्या पदार्थांमुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
◾प्रक्रिया केलेले मांस...
हॉट डॉग,डेली मीट असे प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने मधुमेहासह हृदयविकाराचाही धोका वाढतो.
◾टीप...
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.अधिक माहितीकरिता तज्ञांचा घ्या.
हा लेख आयुर्वेदिक तज्ञ सुनील इनामदार यांचा असून,आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशन श्री सावंत सर यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.