जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबईत, देशात पहिल्यांदाच" मध महोत्सव 2024 चे "आयोजन, दि.18 व 19 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले असून,देशातील व राज्यातील मध उद्योगास चालना मिळावी हा उद्देश असल्याचे,महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले आहे.
दरम्यान मधमाशांना राज्यकीटक स्तराचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू असून,देशात व राज्यात मध क्रांती घडवून आणणे ही या महोत्सवाची संकल्पना आहे.देशातील आपण खात असलेल्या 70 टक्के अन्नात मधमाशांचा वाटा असून, एकंदरीतच मानवीय दृष्टिकोनातून मनुष्यमय जीवनात, मधमाशांचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे.मुंबई येथे संपन्न होत असलेल्या दि. 18 व 19 जानेवारी 2024 रोजी, देशातील पहिल्या "मध महोत्सव 2024"वात,मधमाशांचे प्रकार, उत्पादनाविषयी माहिती,मधमाशांच्या उत्पादनाविषयी प्रशिक्षण,शासन देत असलेल्या अनुदानाविषयी माहिती आदी गोष्टींवर मार्गदर्शनात्मक सल्ला देण्यात येणार आहे. एकंदरीतच मधमाशांच्या उद्योग निर्मितीस,सदरहू महोत्सवामुळे चालना मिळेल हे मात्र निर्विवाद सत्य आहे.