जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून,बुधगाव शहर भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने,खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त,काल गुरुवार दि.4 जानेवारी 2024 रोजी भव्य खुल्या सायकल स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेचा मार्ग गावभाग नाका- बुधगाव ते कवलापूर,कुमठे फाटा,कवठे एकंद,तासगाव चिंचणी,मनेराजुरी,करोली फाटा, उपळावी,कुमठे,कवलापूर ते परत बुधगाव असा होता.
या स्पर्धेमध्ये विजेते क्रमांक पुढीलप्रमाणे.:-
प्रथम क्रमांक -शुभम भोसले, कोल्हापूर.
द्वितीय क्रमांक- भूषण पाटील, कोल्हापूर.
तृतीय क्रमांक- बाळू हिरेमठ, इचलकरंजी.
चतुर्थ क्रमांक- ओम कारंडे,अहमदनगर.
पाचवा क्रमांक- सिद्धेश पाटील, कोल्हापूर.
सहावा क्रमांक - सोहेल बारगीर, सांगली.
सातवा क्रमांक- दानेश तेली, कर्नाटक.
आठवा क्रमांक - हर्षद पाटील, कोल्हापूर.
नववा क्रमांक- आर्यन मळगे,कोल्हापूर.
दहावा क्रमांक -अमन तांबोळी,सांगली.
चिंचणी येथे प्रथम फज्जास वळसा -ओम कारंडे,अहमदनगर.
या स्पर्धेचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे हरिपूरचे नेते अरविंदभाऊ तांबेकर,मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब धामणे,एरंडोलीचे भाजपचे नेते आनंदराव भोई,शिवसेनेचे नेते बजरंगभाऊ पाटील,मिरज पंचायत समिती सदस्य दिलीप कुमार पाटील.बेडग चे जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनुर बुधगाव गावचे सरपंच सदस्य तंटामुक्त उपाध्यक्ष रामदास पाटील बुधगाव भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते व पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.या स्पर्धेसाठी रोख रक्कम 21 हजार पासून भव्य दहा बक्षिसे व स्पर्धकांना नमो चषक देण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक व पंच म्हणून श्री दत्तात्रेय पाटील राष्ट्रीय खेळाडू सांगलीवाडी,शिवछत्रपती पुरस्कार विजेते हुसेन कोरबू,येळावी चे भीमराव सूर्यवंशी,आमिर इनामदार,रेल्वे कोच अभिनंदन भोसले,मैनुद्दीन सय्यद,वैभव बंडगर सर, गजाननतात्या जाधव,यांचे स्पर्धा यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शन व अनमोल सहकार्य मिळाले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ युवा नेते प्रभाकरबाबा संजय पाटील,तासगाव अर्बन बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे, प्रदीप बोथरा,हरिपूर चे माजी सरपंच विकास हानंबर,तासगाव भाजपचे नेते अरुण साळुंखे,माधवनगरचे मंजीत पाटील, कवलापूरचे नलावडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेचे संयोजन पंचायत समिती मिरज चे माजी उपसभापती विक्रम भाऊ पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,सांगली जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव पाटील,भाजप नेते विनायकराव शिंदे पाटील,ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव पाटील,मनोहर पाटील, अविनाश विक्रम पाटील,संभाजी पाटील,माजी सरपंच विजय भाकरे,गजानन मोरे,दिलीप तारळीकर,अभिषेक गावडे, रणजीत माने,अनिल पाटील,रोहित पाटील,पृथ्वीराज शिंदे, विकास पाटील,दशरथ फौजी शिंदे,उत्तम सुतार,उदय मोरे, जहांगीर मोरे,गणेश पाटील,यांच्यासह बुधगाव ग्रामस्थ व सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.