जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने, शिवनेरी किल्ला परिसरात पर्यटन विभागाच्या वतीने होत असलेल्या महादुर्ग 2024 महोत्सव नियोजनाच्या तयारीसाठी बैठक,आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.आज झालेल्या मंत्रालयातील बैठकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महादुर्ग 2024 महोत्सवाच्या नियोजनाच्या स्थितीचा आढावा घेऊन,महादुर्ग 2024 चा महोत्सव यशस्वी होण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्या आहे व त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनात्मक सूचनांचा विचार करून, योग्य ते नियोजन करण्यात यावे अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
महाराष्ट्र राज्यात असलेल्या गडकिल्ल्यांविषयी सविस्तर माहिती व्हावी तसेच पर्यटक राज्यातील गडकिल्ल्यांवर यावेत हा हेतू लक्षात घेऊन,शिवाय राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची सविस्तर माहिती व्हावी हा उद्देश ठेवून,महादुर्ग 2024 च्या महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती पर्यटन सचिव जयश्री भोज यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त,शिवनेरी किल्ला परिसरात होत असलेल्या महादुर्ग 2024 च्या महोत्सवाच्या निमित्ताने,राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती सर्वदूर पोहोचवावी हा उद्देश महाराष्ट्र शासनाचा सफल होईल असे वाटते.