अयोध्या क्षेत्री दि.22 जानेवारी 2024 वार सोमवार रोजी,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बरोबर ऐतिहासिक श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनावेळी पूजेचा मान असलेल्या 11 दांपत्यांत,खारघर येथील श्री.विठ्ठल कांबळे व सौ.उज्वला कांबळे यांना सुवर्ण लाभ.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

अयोध्या क्षेत्री दि.22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या ऐतिहासिक श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूजेच्यावेळी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बरोबर 11 दांपत्यात समावेश असलेल्या,खारघर येथील श्री विठ्ठल कांबळे व उज्वला कांबळे यांना पूजेच्या मानाची सुवर्णसंधी लाभली आहे.अयोध्या क्षेत्री श्रीराम मंदिर ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून,श्री राम मंदिर न्यास समितीने यासाठी जोरदार तयारी केली आहे.अयोध्या क्षेत्र होणाऱ्या दि. 22 जानेवारी 2024 च्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणे साठी,देश विदेशातील अनेक सन्माननीय व्यक्तींसह साधु -संत उपस्थित राहणार आहेत. 

अयोध्या क्षेत्री होत असलेल्या दि. 22 जानेवारी 2024 वार सोमवार रोजी श्री रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर श्री प्रभू रामाच्या पूजेचा मान,11 दांपत्यात समावेश असलेले श्री. विठ्ठल कांबळे व सौ. उज्वला कांबळे यांना मिळाला आहे.यात प्रामुख्याने सुवर्ण लाभाची विशेष गोष्ट म्हणजे श्री प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्याचे सौभाग्य,उभय श्री विठ्ठल कांबळे व उज्वला कांबळे या दांपत्यास मिळणार आहे.देश विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून,त्यांचे बरोबर अनेक साधुसंतांची देखील या ऐतिहासिक श्रीरामलल्लाच्या मूर्ती प्रतिस्थापने वेळी उपस्थिती राहणार आहे.देशात एकंदरीत अयोध्या क्षेत्री होत असलेल्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणे दिवशी, देशात सर्वत्र विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून,सायंकाळी सर्वत्र दीपोत्सव साजरा होणार आहे. एकंदरीतच अयोध्या क्षेत्री दि. 22 जानेवारी 2024 वार सोमवार रोजी होत असलेल्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यामुळे व श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेमुळे, देशातील सर्वच ठिकाणचे वातावरण राम भक्तिमय झाल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top