जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत,सांगली रेल्वे स्थानकावर सर्व सुविधांपासून ते गाड्यांना थांबा देण्या पर्यंतच्या दुर्लक्षित मागण्यासाठी,दि.24 जानेवारी 2024 वार बुधवार रोजी,नागरिक जागृती मंचच्या वतीने व सांगली जिल्हा रेल्वे प्रवाशी यांच्यावतीने जन आंदोलन करण्यात येणार आहे.
गेली काही वर्षे सांगली रेल्वे स्थानकाला कायम,सर्व मूलभूत सुविधांपासून ते गाड्यांना थांबा देण्यापर्यंत डावलले जात असून,या कृतीच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय, नागरिक जागृती मंचच्या वतीने घेतला असून,दि.24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता,रेल्वे स्टेशन समोरील चौकातून जनआंदोलनचा मोर्चा निघून,सांगली रेल्वे स्थानकावरील असणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना,काळे झेंडे दाखवण्यात येतील,परत रेल्वे स्थानकावरून मार्केट यार्ड पर्यंत पदयात्रा निघून,तिथे सभा होणार आहे.
गेल्या 10 वर्षात सांगली रेल्वे स्टेशन सोडून इतर अनेक छोट्या रेल्वेस्थानकावर,सर्व सुविधांसह नवीन रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला आहे,परंतु सांगली रेल्वे स्थानकाला मात्र कायम दुज्याभावाची वागणूक देऊन डावलले जात आहे असे प्रतिपादन नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी केले आहे.गेले काही दिवस जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्यामध्ये, सांगली रेल्वे स्थानक,सर्व मूलभूत सुविधांपासून ते नवीन गाड्या थांबा देण्यापर्यंत व अन्य लांब पल्ल्याच्या इतर राज्यात जाणाऱ्या गाड्यांना थांबा देण्यापर्यंत वंचित राहिले असून, याबाबतीत असंतोष खदखदत आहे.
पुणे- सांगली- लोंढा या रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी सुमारे 5000 कोटी रुपयांचा खर्च करून,इतर रेल्वे स्थानकांचा विकास यात साधला गेला,परंतु सांगली रेल्वे स्थानक मात्र सर्व मूलभूत सोयी सुविधांपासून ते पादचारी पुलापर्यंत दुर्लक्षित राहिले आहे.या सर्व मागण्यांची दखल नागरिक जागृती मंचने घेऊन,सकल रेल्वे प्रवाशांच्या वतीने व नागरिक जागृती मंचच्यावतीने,बुधवार दि.24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता जनआंदोलनाचा मोर्चा,सांगली रेल्वे स्थानकावर नेण्यात येणार आहे. एकंदरीतच सांगली रेल्वे स्थानकावर रेल्वेप्रवाशीयांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी,नवीन गाड्या निर्माण करण्यासाठी,सर्व गाड्यांना सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी,या व इतर काही मागण्यांसाठी रेल्वे प्रशासना विरोधात जनआंदोलन उभारावे लागते हे विशेष म्हणावे लागेल.