जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
या वर्षी असणारी दुष्काळी परिस्थिती व आता उद्भवलेल्या अवकाळीच्या संकटामुळे, शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत तासगाव कारखान्याच्या प्रशासनाने,निहित एफ.आर.पी.पेक्षा जास्त 3150 रुपयांचा दर देण्याची जाहीर केले असल्याची माहिती कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे.येत्या 10 दिवसात संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले , अत्यंत अडचणीच्या काळात तासगाव कारखाना आम्ही सुरू केला.प्रसंगी आर्थिक पदरमोड करून फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून,आम्ही कारखाना सुरू केला.अचूक काटा हे तासगाव कारखान्याचे वैशिष्ट्य आम्ही आजही कायम ठेवले आहे.
यावर्षी शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिचला आहे.उसाचे टनेज कमी भरत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला आहे.त्यामुळे बाकीच्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे टाकत,शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने,एफ.आर.पी.3000 पेक्षा कमी असतानाही, आम्ही एक रकमी 3150 शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 दिवसात पेमेंट जमा होईल.यापूर्वी ऊस दिलेल्या व पुढील देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हा दर लागू राहील असे ही ते म्हणाले.यावर्षी 4 लाख टना पेक्षा जास्त उसाचे गाळप करण्याचे,कारखाना प्रशासनाचे नियोजन आहे.पुढील वर्षी आम्ही कारखान्याची गाळप क्षमता वाढवत आहोत.जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देता येईल असेही खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले आहे.