जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
बारामती औद्योगीक क्षेत्रामध्ये मयुरेश्वर असोसिएटस् यांना, कोणतीही निविदा न काढता,कदम ब्रदर्स पांचा C 1 हा भुखंड वाचविण्याकरीता, भ्रष्ट्राचार करून दर्शनी भागातील भुखंड क्र. X-13 हा कवडीमोल भावाने देण्यात आला आहे.यामध्ये तत्कालीन मंत्री ते संबंधित व मराऔविम (MIDC) चे अधिकारी दोषी आहेत.याचेच फलित म्हणून एका पुण्यातील MIDC चे अधिकाऱ्याने संबंधीत भुखंडामध्ये होणाऱ्या मॉल मध्ये स्वतःच्या वडिलांच्या नावावर भागीदारी मिळावलेली आहे.शासनाचे नुकसान करून स्वतःची घरे भ्रष्ट प्रशासनावर तात्काळ कडक कारवाई व्हावी व प्रस्तुत प्रकरणी नियम धान्यऱ्यावर बसवुन प्रदान करण्यात आलेले दोन्ही भुखंड (C-1 वX-13), हे तात्काळ स्थगीती देऊन ताब्यात घेण्यात यावेत.
बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे खाजगी दलालाच्या माध्यमातुन अतिरिक्त भार असलेल्या गाड्या चालविण्यासाठी,विशिष्ट रकमांची वसुली करतात तर लाईसन्स देण्याकरीता शासकीय फि व्यतिरिक्त जादाची रक्कम आकारतात,अशा सर्व कर्मकांडाच्या माध्यामातुन करोडो रूपयांची मोहमाया संबंधित आर.टी.ओ.हे गोळा करतात व या सर्व कार्यात मदतनिस म्हणून काम करणारे काही कर्मचारी जनतेशी अरेरावीची भाषा करतात. संबंधित आर.टी.ओ. यांचेकडे तक्रार केल्यानंतर,आर.टी.ओ.हे त्यांचे समर्थन तथा पाठराखण करतात म्हणून त्यांचेवर तात्काळ चौकशी करून निलंबन करावे व तुर्तास संबंधित आर.टी.ओ.राजेंद्र केसकर यांची बदली व्हावी अशी मागणी,आमरण उपोषण कर्ते वस्ताद सचिन उर्फ पप्पू माने यांनी केली आहे.
बारामती शहर व तालुका हद्दीमध्ये तीन टप्प्यामध्ये झालेले इंफ्रा स्ट्रक्चरच्या कामाअंतर्गतचे काम हे अतिशिय निकृष्ट दर्जाचे झाले असून,यामध्ये वापरण्यात आलेले साहीत्य अतिशय निकृष्ट दर्जाचे व बहुतांशी प्रमाणात जुने वापरले आहे व कामामध्ये निघालेले भंगार याची कोणतीही माहीती बारामती नगरपरिषद किंवा म.रा.वि.वि.क.मर्या बारामती यांचेकडे ही नाही.म्हणजेच साहीत्य (भंगार) चोरी गेले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन,इंफ्रा व म.रा वि वि.क. मर्या. बारामती यांचेवर कारवाई व्हावी.बारामती,दौड,इंदापूर, पुरंदर या भागात मोठया प्रमाणात मटका,जुगार,ऑनलाईन मटका सावकारी,ऑनलाईन जुगार,अवैद्य दारू,ताडी,अमली पदार्थ (टरमिन, इमा, स्टेरॉईन, गांजा) इ.अवैद्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत,यावर प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तरी तात्काळ सदर अवैद्य धंदे बंद व्हावेत,म्हणून आम्ही या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात, शासनाची मलीन होणारी प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी व जनतेसमोर हे दाखविण्यासाठी तसेच मा.मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य,मा.उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री मा.उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य,मा.उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य,मा.राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांची नावे घेऊन व यांचा या सर्व पापकृत्यात आशिर्वाद आहे असे भासवुन,जनतेच्या मनात संबंधित प्रशासन भितीयुक्त वातावर निर्माण करीत आहेत व यामुळे आमच्या भाजप- शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई (A) महायुतीची बदनामी हे प्रशासन,स्वत:चे आर्थिक हीत साधण्यापायी करीत आहे.
तरी सदर प्रकरणी कारवाई होणे कामी आम्ही प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधुन, दि. 26/01/2024 पासुन बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर महायुतीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणास बसतो आहे. जरी प्राणाची आहुती गेली तरी कारवाई झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे वस्ताद सचिन माने यांनी स्पष्ट केले आहे.
आज उपोषणाचा 5 वा दिवस असल्यामुळे,उपोषण कर्ते वस्ताद सचिन माने यांची प्रकृती नाजूक बनत चालली असल्याचे वृत्त आहे.महाराष्ट्र शासनाने याबाबतीत त्वरित लक्ष घालण्याची मागणी,संबंधित उपोषणाला बसणाऱ्या वस्ताद सचिन माने यांचे सह इतर सर्व नागरिकांनी केली आहे.