जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मराठा समाजाचे नेते व आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी,प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्यासाठी, 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली सराटी येथून निघून 26 जानेवारी 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता अंतरवाली सराटी येथून निघणार असून,त्यांचा पहिला मुक्काम शिरूर तालुक्यातील मातोरी डोंगरपट्ट्यात असून,त्यापुढील 7 मुक्काम हे करंजी घाट,रांजणगाव,खराडी बायपास पुणे, लोणावळा,वाशी,नवी मुंबई व शेवटी 26 जानेवारी 2024 रोजी आझाद मैदानावर आंदोलन स्थळी पोहोचणार आहेत.रोज सुमारे 900 ते 100 किलोमीटरचा प्रवास करून,मुंबईतील आझाद मैदानावर 26 जानेवारी रोजी पोहोचणार आहेत.
दरम्यान आम्ही महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली असून,सरकारने परवानगी नाकारले तरी आम्ही जाणारच असा इशारा मराठा समाजाचे नेते व आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.त्याबरोबरच मराठा समाजासाठी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नसल्याचेही प्रतिपादनहि मराठा समाजाचे नेते,आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर, मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागून,राहिले असून,महाराष्ट्र शासन याबाबतीत काय भूमिका घेती? हे महत्त्वाचे ठरेल.