जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
झारखंड राज्यातील धनबाद मधील करमांटाड येथे राहणाऱ्या 85 वर्षीय सरस्वती देवी यांनी गेल्या 30 वर्षांपूर्वी अयोध्या क्षेत्रातील श्री राम मंदिरासाठी मौनव्रत संकल्प केला होता.
रामलल्ला जोपर्यंत मंदीरात विराजमान होणार नाहीत तोपर्यंत मौन व्रत ठेवण्याचा ३० वर्षापूर्वी संकल्प केला होता.बाबरी पाडल्यानंतर त्यांनी हे मौन व्रत ठेवले आहे.जवळपास ३० वर्ष झाली.त्या एकही अक्षर बोललेल्या नाहीत.त्यांना जर काही बोलायचं असेल तर त्या कागदावर लिहून देतात.त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांची नेहमीच चर्चा असते.22 जानेवारीला 2024 ला श्री.रामलल्ला मूर्तीं प्राणप्रतिष्ठापनेने विराजमान झाल्यानंतर,त्या 30 वर्षानंतर,आपले मौन व्रत सोडणार आहेत.भक्ती मध्ये शक्ती आहे म्हणतात ती हीच.राम मंदिर निर्माणामध्ये या शक्तीचा ही मोलाचा वाटा आहे.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क च्या वतीने,झारखंड राज्यातील धनबाद मधील करमाटांड येथे राहणाऱ्या सरस्वती देवी यांना त्रिवार वंदन.