जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशात यंदाच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून,देशातील सर्व राजकीय पक्षांचे मतदारांना व शेतकऱ्यांना आकर्षित करून घेण्यासाठी निवडणुकीत दिलेले जाहीरनामे,निवडणुकीपूर्वी कायद्याच्या कक्षेत आणावेत अशी मागणी कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केली आहे.
देशातील राजकीय विविध पक्ष निवडणूक आली की, देशातील नागरिकांना व शेतकऱ्यांना आवास्तव आश्वासने जाहीरनाम्यात देऊन,खैरात करत असतात व परंतु ते जाहीरनामे सत्यतेत न उतरता,निवडणुकीनंतर जाहीरनाम्यातील दिलेल्या आश्वासनांचा,देशातील राजकीय पक्षांना विसर पडतो.त्यामुळे देशातील निवडणुकीत, नागरिकांना,मतदारांना,शेतकऱ्यांना दिलेली जाहीरनाम्यातील आश्वासने सत्यतेत उतरण्यासाठी,देशात एक कायदा होण्याची अत्यंत गरज असल्याचे मत सोलापूर येथील कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी एका वृत्तवाहिनीच्या शेतकरी परिषदेत व्यक्त केले आहे.
जर देशातील विविध राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने जर सत्यतेत उतरली, तर देशातील नागरिकांना, मतदारांना व शेतकऱ्यांना खरोखरच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना परत जाब विचारण्याची किंवा आंदोलन करण्याची पाळी येणार नाही.देशातील सर्व राजकीय पक्षांनी या गोष्टीचा विचार करून,देशाच्या आधुनिक विकासाचे स्वप्न सत्यतेत आणण्यासाठी,सार्वमत घेऊन,देशाच्या संसदेत एक कायदा करावा असे वाटत असल्याचे मत सोलापूर येथील कृषी भूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केले.
एकंदरीतच देशातील केंद्र सरकारने व विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जर,देशातील विविध राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात देत असलेल्या आश्वासनाबाबतीत,एखादा कायदा केला तर,त्याचे देशाच्या आधुनिक विकासाच्या बाबतीत व देशातील नागरिकांना, मतदारांना,शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल यात शंका नाही.