सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

 मंगळवेढा येथे शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी दुपारी 2:00 वाजता,माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंद्रिय शेती शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती,ऍड भारत पवार व हरिभाऊ यादव यांनी पत्रकारांना दिली. 

 महाऑरगॅनिक अँड रेश्यूड्युफ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फा च्या वतीने मंगळवेढा येथे शुक्रवार दि १९ जानेवारी रोजी दुपारी 2:00 वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरदचंद्रजी पवार,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची कार्यशाळा सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट,गोपनबाई विहिरी समोर,मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली आहे.

 राज्यभर सेंद्रिय शेतीमध्ये वाढ होत आहे.पण सेंद्रिय शेती उत्पादनांना शाश्वत मार्केट मिळत नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेती बाबत खुष नाहीत.तसेच महाराष्ट्रातील जमिनीची सुपीकता संपत चाललेली असून जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमालीचा घटत आहे,जमिनीचे आरोग्य  चिंताजनक अवस्थेत आहे.नागरिकांनाही सेंद्रिय व विषमुक्त शेती उत्पादने मिळत नसल्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहे.यासाठी शेतकरी व ग्राहक यांचा समन्वय करून सेंद्रिय शेती उत्पादनांना चांगले मार्केट मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे ऍड पवार व यादव यांनी सांगितले.तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन सुदर्शना आनंद लोकरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top