आरोग्य भाग- 19
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
शरीरास आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक व कच्चा आहाराविषयी,अत्यंत सखोल अशी महत्त्वपूर्ण माहिती.!--
◾नैसर्गिक व कच्चा आहाराचे महत्व खालील प्रमाणे!....
१. पचनास अत्यंत सुलभ.सहज उपलब्ध होते.खर्च कमी असतो.
२. कच्या आहारामुळे तरतरी उत्साह व कुशाग्र बुध्दिमत्ता निर्माण होते.रोगप्रतिकार शक्ती वाढते.
३. मुलांचे अभ्यासातील एकाग्रता वाढवुन बुध्दिमत्ता तल्लख झाल्यामुळे स्मरणशक्तीत वाढ होण्यास मदत होते.
४. सर्व जीवनसत्वाचा मुबलक प्रमाणात साठा.
५. अनावश्यक चरबी वाढणे व वजन वाढण्यापासून प्रतिबंध.
६. कच्या आहारामुळे दुर्धर रोग निघुन जातात व सदृढ आरोग्याची निर्मिती होते.
७. सर्व फले व भाजीपाला यांच्या सेवनाने डोळ्यांचे व मेंदूचे कोणतेही विकार होत नाहीत.
८. मुलांची शाररिक वाढ व उंची उत्तम होते.
◾नैसर्गिक कच्या आहारामध्ये खालील अन्नपदार्थाचा समावेश करावा.
१. मोड आलेली कडधान्ये-मटकी,मूग,चवळी, मसुरा,हरभरे,शेंगदाणे इत्यादी.
२. कच्या पालेभाज्या -मेथी ,पालक ,कोबी,चाकवत,कोथिंबीर,शेपू, तांदळी,चिगळ व इतर
३. फळे व फळाचा-ज्युस-सफरचंद,डाळींब,केळी,संत्री,मोसंबी,आवळा,अंजीर,जांभूळ,आंबा,अननस मोसमानुसार उपलब्द्ध होणारी सर्व फळे
४. सॅलेड भाज्या-काकडी,बीट,गाजर,मुळा,रताळे,इत्यादी
५. गव्हाकार ज्युस-गहू भिजवणे व त्याला मोड आणणे व त्याचा ज्युस करून घेणे,(३५० रोगासाठी अत्यंत परिणामकारक गव्हाकार ज्युस
६. कोहळा ज्युस-कोहळा खिसुन त्याचा ज्युस बनवणे,नवचैतन्य्य प्राप्त करून देतो,शरीराची शुद्धी होते,शांतता लाभते बुद्धी तल्लख होते.
◾आहारातून वर्ज्य करावयाच्या अन्नपदार्थाची यादी.--
१. तळलेले तेलकट पदार्थ
२. आती तिखट पदार्थ
३.बेकरी पदार्थ
४. मैदाजन्य पदार्थ
५. आहारातून कमी करावयाचे पांढरे पदार्थ - साखर,मैदा , मीठ,दूध
- तेलाला आपल्या आहारामध्ये अत्यंत महत्त्व आहे तरी सर्वांनी लाकडी घाण्यावरचेच तेल वापरावे.
(नैसर्गिक व कच्चा आहारामुळे आपले अत्यंत दुर्धर व जुने आजार( डायबिटीस,शुगर,मायग्रेन,थायराइड इत्यादी बरे होऊन तुम्ही निरोगी व आनंदी जीवन जगू शकता.)
सदरहू लेख आचार्य नारायण गुरुजी यांच्या ध्यान,प्राणायाम व आहार शिबिरातून,कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी संकलित केला असून,तो लेख जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.