सांगलीतील "श्रीराम भक्त उत्सव",रामनाम व सदाचरणात मानवाचे कल्याण आहे.--शंकराचार्य श्री नरसिंह सरस्वती करवीर पीठ.!-

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

प्रभू श्रीराम चराचरात आजही आहेत.त्यांच्या भक्तीतून मानवाला धर्म शिकता येते.सेवकांची निवड कशी करावी हे श्रीराम भक्त हनुमानाच्या निवडीवरुन शिकता येते.सदाचरण, करुणा,बंधुभाव जपणे हे गुण महत्वाचे आहेत.परस्त्री मातेसमान माना.चांगुलपणा सिध्द करा..रामनाम जप करा असे आशीर्वचन करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी दिले.ते सांगली येथील नेमिनाथनगर मधील कल्पद्रुम क्रिडांगणावर पृथ्वीराज पाटील व डॉ. पतंगराव कदम फौंडेशन आयोजित श्रीराम भक्ती उत्सवातील आशीर्वचनात बोलत होते.

या भक्ती उत्सवात करवीर पिठाचे शंकराचार्य यांचे आगमन सांगलीकरांची श्रीराम भक्ती द्विगुणित करणारी ठरली.पूज्य शंकराचार्य यांनी प्रथम श्रीरामाचे दर्शन घेतले.त्यांच्या पावन सान्निध्यात आरती झाल्यानंतर महाराजांची पाद्यपूजा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाली व त्यांनी यावेळी महाराजांना प्रभू श्रीराम,जानकी,लक्ष्मण व हनुमान मूर्ती असलेले स्मृतीचिन्ह प्रदान केले व करवीर पिठाला आमचे कायम पाठबळ राहिल असे पृथ्वीराज यांनी महाराजांना सांगितले.

सकाळी राजेश्वर शास्त्री धारवाड यांनी रामतारक यज्ञाचे पौरोहित्य केले.यावेळी समस्त सांगलीकरासाठी प्रभू श्रीरामांचे कल्याणकारी आशीर्वाद लाभो,सर्वांचे भले व्हावे अशी पृथ्वीराज पाटील यांनी यज्ञावेळी प्रार्थना केली. 

अयोध्येहून विधीवत पूजा करून आणलेल्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने कालपासून सांगलीकर हजारोंच्या संख्येने नेमिनाथनगरच्या कल्पद्रुम क्रिडांगणावर दर्शनासाठी अलोट गर्दी करत आहेत. आजही सांगलीकरांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

यावेळी विजय चिप्पलकट्टी,जयपाल दत्तू चिंचवाडे, आप्पासाहेब पाटील,डॉ.किल्लेदार,चंद्रकांत पाटील,मनोज भोसले,एन.एम. हुल्याळकर, विरेंद्रसिंह पाटील,विजया पाटील,प्रा.एन.डी.बिरनाळे नितीन तावदारे,अविनाश कोठावळे,बिपीन कदम,सनी धोतरे,मारुती देवकर इ.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top